गणपती बाप्पा मोरया..बलात्कारांना फाशी द्या..!;माऊली गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सामजिक संदेश
click2ashti update-वस्ताद बॉईज आयोजित माऊली गणेश मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा केला.यावर्षी हस्ताक्षर स्पर्धा,संगीत खुर्ची,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आले.गणपती विसर्जनच्या दिवशी व गणपती बाप्पा मोरया यांच्या घोषणा देऊन डीजेवर विविध प्रकारचे सामाजिक ऐक्य व धार्मिक गाणे लावून आनंदोत्सव साजरा केला.सध्या देशात व राज्यात महिला भगिनींवर वाढते अत्याचार घटना घडत असताना अत्याचार थांबण्यासाठी कठोर कारवाई करून या गणपती विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया…बलात्कारांना फाशी द्या..!असे पोस्टर व फलक झळकत संदेश देत माऊली गणेश मित्र मंडळ वस्ताद बॉईजच्या वतीने हा एकमेव आगळावेगळा संदेश देण्यात आला.
भाविकांची गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. अनेकांनी या गणपती विसर्जन मिरवणूकमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’ बलात्कारांना फाशी द्या..या संदेश फलकाचे कौतुक केले.यावेळी संतोष रणसिंग अध्यक्ष,साईनाथ बाल्हेकर,उपध्यक्ष दत्ता माने,अमोल बनसोडे, कोषाध्यक्ष प्रशांत दळवी,शंकर रणसिंग,ऋषिकेश वाल्हेकर, महेश वाल्हेकर,अमोल मुळे,अमोल बनसोडे,गणेश रेडेकर,ओंकार वाल्हेकर,कैलास माने,किरण कुन्हाडे,सूरज ससाणे,सूरज शिंदे विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मोठ्या उत्साहात हा आनंदी सोहळा पार पाडला व गणपती बाप्पांना निरोप देत…गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा हि दिल्या.