व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

वाजत-गाजत बप्पाला सकाळी दिला निरोप;नंतर ह्रदयविकाराचा झटक्याने पोलिसांचा मृत्यू

0

click2ashti update-अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर उर्फ बप्पा मोरे यांचा ह्रदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी रविवार दिनांक 15 रोजी अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात स्थापण करण्यात आलेल्या श्री चे विसर्जन करण्यात आले.यावेळी कर्मचाऱ्यांनी बाप्पाला मोठ्या थाटात बप्पाला निरोप दिला.यामध्ये या ठाण्यात करत असलेले ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांनीही “ना सांगताच कळे आज मला…कसा जीव माझा तुझ्यावर गुंतला…! ह्या गाण्यावर नाचत सर्वांची मने जिंकली.त्यानंतर रविवार रात्री घरी गेल्यानंतर पहाटे च्या समस बाप्पा मोरे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.त्यांच्या या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा विषय पुन्हा समोर आहे.
अन् बाप्पाचे ते गाणे शेवटचे ठरले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.