व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दोन हजार कोटींच्या विकास कामांन पैकी शिंपोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी चे काम सुरू;बाकी कामे मंत्री महोदयच्या टेबलवर अडकले

0

click2ashti updateआष्टी– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यांतील सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांसाठी मंजुरी दिली होती.यापैकी फक्त शिंपोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी खुंटेफळ साठवण तलावाचे सुमारे ११५० कोटी रूपायांचे काम सुरू असून,बाकी कामे मात्र अधिकारी व मंत्री महोदयांच्या टेबलवर मंजुरीसाठी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक असे मराठवाड्याचा कायापालट करणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प मागील वर्षी 16 संप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.या मध्ये आष्टी तालुक्यातील विविध विकास कामांचा समावेश असून या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांसाठी करण्यात आली होती.या घोषणेमुळे कायम अवर्षणग्रस्त असलेल्या या आष्टीसह पाटोदा व शिरूर कासार तालुक्यांतील लातूर पद्धतीचे बंधारे व साठवण तलावासाठी निधी जाहीर झाल्याने जलसिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.तसेच शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या औद्योगिक धोरणानुसार आष्टी तालुक्यातील शेतीपुरक एमआयडीसीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीसही चालना मिळणार होती.परंतु औद्योगिक विभागाचे कामाची वर्षभरात कसलीच हालचाल दिसली नाही.
मागील वर्षी मंत्रिमंडळात मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे
१)आष्टी तालुक्यातील-खडकत क्रमांक एक,पिंप्री घुमरी,खडकत क्रमांक दोन,पिंपळसुटी,सांगवी संगमेश्वर,सांगवी नागापूर या सहा कोल्हापुरी बंधा-यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रत्येकी ६० कोटी असे एकूण ३६० कोटी रुपये.-मंजूरीसाठी मंत्री महोदय यांच्या टेबलवर
२)शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब व निमगाव (मा.) येथील लातूर बॅरेजसाठी प्रत्येकी ३० कोटी असे एकूण ६० कोटी रुपये.-मंजूरीसाठी अधिकारी यांच्या टेबलवर
३) आष्टी उपजिल्हा रुग्णालयासाठी ३५ कोटी रुपये.-निविदा निघाली
४) पाटोदा येथील प्रशासकीय इमारतीसाठी ३० कोटी रुपये.-काम सुरू
५) पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी साठवण तलावासाठी १९ कोटी रुपये.-मंजूरीसाठी अधिकारी यांच्या टेबलवर
६) पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा साठवण तलावासाठी १५ कोटी रुपये.-मंजूरीसाठी अधिकारी यांच्या टेबलवर
७) आष्टी येथे शेतीपूरक एमआयडीसीसाठी ३८ कोटी रुपये.-कामाचे टेटस काहिच नाही
८) शिंपोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी खुंटेफळ साठवण तलावाची १३५० कोटी रुपयांची निविदाही लवकरच काढण्यात येणार आहे.-काम प्रगतीपथावर सरू

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.