व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

VIDEO-गणपती विसर्जन मिरवणुकीत सुरेश धसांनी धरला ठेका…

0

click2ashti update-गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे पारंपारिक वाद्यांचा गजर,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग,तरुणांचा सळसळता उत्साह,याबरोबरच लेझीम पथक,डिजेवर थिरकणारे गणपती मंडळे दिसून आले.यावर्षीची विसर्जन मिरवणुकीत माजीमंत्री सुरेश धस त्यांच्या कुटुंबीयातील सदस्य मंडळांसमोरच्या पारंपरिक वाद्यांवर चांगलेच थिरकले.
या ना त्या कारणाने आष्टीतील मिरवणूक दरवर्षी गाजते.यावर्षी राजकीय नेत्यांच्या मिरवणुकीतील उत्साही सहभागानेही ती लक्षवेधी ठरली.आष्टी शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत माजीमंत्री सुरेश धस हे रात्री 8 वा.सुमारास सहभागी झाले.शहरातील मानाचा रथ क्र.1 दत्त गणेश मंडळात ते सहभागी झाले.त्यानंतर प्रत्येक मंडळात हजेरी लावत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आग्रहाखातर सुरेश धस यांनाही गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.