व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

हरिनारायण आष्टा शाळेला मुख्यमंत्री स्वच्छ शाळा..सुंदर शाळेचे..तीन लाखाचे बक्षीस

पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान

0

click2ashti update-शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये संपन्न झालेल्या मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळामधून जि.प.माध्यमिक हरिनारायण आष्टा शाळेचा तिसरा क्रमांक आला होता.बीड येथील पोलीस मुख्यालय येथे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बीडचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते तर बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.
मागीलवर्षी मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा शाळेचा बीड जिल्ह्यामध्ये तिसरा क्रमांक आला होता.याचे बक्षिस वितरण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून,बीड येथील पोलीस मुख्यालय येथे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बीडचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,उपशिक्षणाधिकारी मैना बोराडे,शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप,सरपंच गणेश माळवे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पठाडे यांच्यासह आदि उपस्थित होते.आष्टा शाळेने बक्षिस मिळविल्याबद्दल माजी राज्यमंत्री सुरेश धस,आष्टीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,ज्येष्ठ अर्जुन गुंड, विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे सचिव महेशकुमार शिंदे, संचालक प्रविण मेहरकर,अमरराजे निंबाळकर,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साईनाथ गळगटे आदिंनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.