व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हाती पुन्हा काँग्रेसचा पंजा: अशोक चव्हाण यांना धक्का

0

नांदेड click2ashti माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करत अशोक चव्हाण यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. आज माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व मीनल पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईच्या टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात भास्करराव पाटील यांचा पक्षप्रवेश झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.