व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी विराजमान

0

नवी दिल्ली click2news दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आपच्या नेत्या आतिशी मार्लेना आज मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. सकाळी उपराज्यपालांनी आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची नोंद झाली आहे.
केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहिर केले होते. १७ सप्टेंबर रोजी त्यांनी राजीनामा दिला. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हण्ून आतिशी यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली. अखेर आज शनिवारी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आतिशी या आपच्या आमदार आहेत. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.