पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकारामांचे नाव
पुणे click2news उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकारामांचे नाव देण्यात येणारअसल्याची घोषणा फडणवीस यांनी कार्यक्रमात केली.
पुणे येथील श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत दिवेघाट ते हडपसर पॅकेज 6 रस्त्यांचे चौपदरीकरण, मुळा व मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम, सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत 1.6 किमी लांबीच्या सेवा रस्त्याचे बांधकाम, या सर्व प्रकल्पांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकारामांचे नाव देण्यासंदर्भात खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारकडे प्रस्ताव दिला होता, तो स्वीकारला असून येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.