मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच : खडसे
मुंबई click2news-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता खुद्द त्यांनीच पूर्ण विराम दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र पक्षांंतर्गत विरोधामुळे खडसे यांचा पक्षप्रवेश लांबला. गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीष महाजन यांनीही खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतीलअसे सांगितले होते. मात्र आता या सर्व चर्चांना नाथाभाऊंनी पूर्णविराम देत मी आता राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.आपल्या भाजप प्रवेश गणपती विसर्जनासोबत विसर्जित झाल्याचे खडसे म्हणाले.