छत्रपती संभाजीराजेंकडून जरांगेच्या प्रकृतीची विचारपूस
जालना click2news मराठा आरक्षणासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सातव्यांदा अंतरवलीसराटी येथे उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाच्या सातव्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांनी अंतरवलीसराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. उपोषणमुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याने जरांगे यांची प्रकृती बिघडली तर त्याला राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.
आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या माध्यमातून आता आरपारची लढाई सुरु केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून राज्यभरात मराठा बांधव उपोषणस्थळी भेट देत आहेत. दरम्यान आज सोमवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली असता जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. जरांगेंना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडेही जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.