व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बीडच्या शासकीय आयटीआयला स्व.विनायक मेटेंचे नाव

0

मुंबई click2ashti बीडसह राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे (आयटीआय) नामकरण करण्यात आले असून या चौदा आयटीआयला थोर समाजसुधारकांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे बीडच्या शासकीय आयटीआयला स्व.विनायकराव मेटे यांचे नाव देण्यात आले आहे.
राज्यातील १४ औद्योगिक संस्थांचे नाव बदल व्हावे यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील 14 शासकीय औद्योगिक संस्थांना थोर समाजसुधारकांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे – धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड – कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड असे नामकरण करण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील १४ आयटीआयचे नामकरण करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.
WhatsApp Group