व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मनोज जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

0

मुंबई click2news मराठा योध्दा मनोज जरांगे यांनी पुन्हा सहाव्यांदा उपोषण सुरु केले असून त्यांना शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत शरद पवार असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले असून यंदाही शरद पवार हे मनोज जरांगे यांच्या सोबत आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीनंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न करतील शरद पवार प्रयत्न करतील असा दावाही आंबेडकर यांनी केला

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.