मराठा आरक्षण; लातूरमध्ये दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
बीड click2news-मराठा आरक्षणासाठी ये दाम्पत्याने विष प्रशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना लातूरमध्ये घडली.ज्ञानोबा तिडोळे आणि चंचला तिडोळे असे या पती पत्नीचे नाव आहे.
या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हण्ून मनोज जरांगे पाटील वर्षभरापासून लढा देत आहेत.आरक्षणासाठी जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे सहाव्यांदा उपोषण सुरु केले होते.मात्र सरकारने या उपोषणाची कसलीच दखल घेतली नसल्याने मराठा समाजात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाची दखल शासनाने घेतली नाही आिण मराठा आरक्षण प्रयत्न निर्णय घेतला नाही म्हणून लातूरमध्ये तिडोळे दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.