व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

योगेश भैय्या बीड शहराची चाळणी करण्यात तुमचा पन मोठा वाटा

0

बीड click2news-शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. दोन, चार व्यक्तींमुळे बीडची वाट लागली नसून शहराची चाळणी फक्त आिण फक्त क्षीरसागर कुटुंबियांमुळेच झाली आहे. योगेश भैय्या बीड शहराची चाळणी करण्यात तुमचा पन मोठा वाटा आहे. शहरातील जनतेेनेचे 30 वर्षांहून अिधक काळ नगर पालिका क्षीरसागरांच्या एक हाती दिली. मात्र क्षीरसागरांनी जनतेचे उपकार फेडण्याऐवजी एकमेकांच्या राजकीय स्वार्थासाठी शहरात समस्यांचा डोंगर उभा करुन नागिरकांना वेठीस धरण्याचे पाप केले आहे असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे.
जिल्हाप्रमुख मुळूक म्हणाले की,बीड शहरातील काही रस्त्यांची कामे करुन दोन्ही क्षीरसागर विकासाच्या गप्पा मारतात.मात्र आजही शहरातील रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यांची वाट लागली आहे.गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरले. भाजीमंडईतील संस्कार विद्यालयातही पाण्याचा शिरकाव झाला तर काही भागामध्ये पाण्याचे तळे साचले आहे. जालना रोडवर दुकानांमध्ये पाणी शिरले. शहरात प्रत्येक वाॅर्डात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून घंटागाड्या कधी येतात तर कधी येत नाही. आठ आठ दिवस वॉर्डांमध्ये घाण साचून दुर्गंधी निर्माण होत आहे. शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या 30 वर्षांवर बीडची नगर पालिका क्षीरसागरांच्या ताब्यात होती. तेव्हापासून आजतायगत या रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. शहरातील चार दोन रस्त्यांची कामे करुन विकासाच्या नावाखाली शहराला भकास करण्याचे काम क्षीरसागरांनी केले आहे. शहरातील मोठ्या प्रमाणात रस्ते आजही खड्डेमय आहेत.शहरातील रस्त्यांची वाट लागण्यासाठी अधिकारी, नागरिक जबाबदार नसून,केवळ क्षीरसागरांमुळे आज शहराची चाळणी झाली असून याचे खापर सर्वसामान्य बीडकरांवर फोडले जात आहे.शहरातील जनतेेनेचे 30 वर्षांहून अधिक काळ नगर पालिका क्षीरसागरांच्या एक हाती दिली.मात्र क्षीरसागरांनी जनतेचे उपकार फेडण्याऐवजी एकमेकांच्या राजकीय स्वार्थासाठी शहरात समस्यांचा डोंगर उभा करुन नागिरकांना वेठीस धरण्याचे पाप केले आहे असेही शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.
WhatsApp Group