पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे
मुंबई click2ashti उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तटकरे यांची केलेली नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका एक महिन्याच्या अंतरावर आहेत. विधानसभेचे आचारसंहिता केव्हाही लागू शकते. दरम्यान महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून नाराज नाट्य सुरू असल्याचे दिसून येते. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महायुतीच्या काही नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे टीका केली जात आहे. यामुळे अजित पवार त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. महायुती च्या मित्र पक्षातील धूसपुस लपून राहिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमध्ये राहावे यासाठी केंद्र सरकारने तटकरे यांची पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीवरून अजित पवार यांना महायुतीत थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जाते.