धनगर समाज आरक्षणासाठी बेपत्ता झालेले दोन आंदोलक जिवंत सापडले
नगर click2ashti धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेऊन बेपत्ता झालेले दोन आंदोलक आज शुक्रवारी जिवंत सापडले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेवासा फाटा येथे गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाच्या सहा आंदोलकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान काल बाळासाहेब कोळसे व प्रल्हाद सोरमारे हे दोन आंदोलन सकाळी शौचास जातो म्हणून गेले होते ते परत आलेच नाही. यातील एकाने शेवटचा जय मल्हार असे स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली होती. जलसमाधी घेतल्याची भीती निर्माण झाली होती. त्यानुसार, पोलिसांनी प्रवरा संगम नदीपात्रात शोधाशोध मोहीम सुरू केली. शुक्रवारी सकाळी हे दोघेही प्रवरा संगम नदीपात्रात सापडले आहेत. पोलिसांनी या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.