भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन;सकाळी ११ वा.होणार अत्यंसंस्कार
पुणे वृत्तसेवा-भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून मुक्ता टिळक यांच्यावर कॅन्सर आजाराच्या संदर्भात उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.शुक्रवारी (दि.२२)रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.मुक्ता टिळक या’भारताच्या असंतोषाचे जनक’लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.
मुक्ता टिळक या आमदार होण्यापूर्वी पुण्याच्या सन 2017 ते 19 या दरम्यान महापौर होत्या.कसबा विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष आमदार राहिलेले पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या रिक्त जागेवर मुक्ता टिळक यांची वर्णी लागली होती.त्यानंतर बापट यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी टिळक यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.मागील दीड ते दोन वर्षांपासून टिळक या कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होत्या.याबाबत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी 9 ते 11 केसरीवाडा येथील राहत्या घरी ठेवण्यात येईल.अंत्यविधी वैकुंठ स्मशानभुमी येथे 11 वाजता होणार आहे.