राशीन येथील स्टेडियमच्या भूमिपूजनाला येणार क्रिकेटपटू रोहित शर्मा
नगर click2ashti भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. या स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणार असल्याचेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदार संघातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याची भूमिपूजन घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
घटस्थापनेच्या दिवशीच आणि आई जगदंबा मातेचे वास्तव्य असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील राशीनच्या पवित्र भूमीत भारताला विश्वचषक मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आपण क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करणार आहोत, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर शेअर केली आहे.