मिस फायरिंगमुळे अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी
मुंबई click2ashti स्वतःचे परवानाधारक पिस्तूल साफ करताना मिस फायरिंग झाल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. पिस्तुलातील गोळी पायाला लागल्याने गोविंदाला दुखापत झाली असून मुंबईच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल त्याला दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागून जखमी झाल्याचे माहिती कळतच पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन रिव्हॉल्व्हर ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी परमजीत सिंह दहिया यांनी सांगितले की, ज्या बंदुकातून गोळी झाडण्यात आली ती बंदूक परवानाधारक आहे. याबाबत डीसीपी लवकरच अधिकृत निवेदन देणार आहेत. दरम्यान गोळी लागून मोठा रक्तस्त्राव झाल्याने गोविंदाला
अंधेरीच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पायातली गोळी काढण्यात आली आहे.