व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बस-मोटारसायकलचा अपघात;युवक जागीच ठार

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळुज येथील घटना

0

आष्टी click2ashti-स्वता;च्या आयशर टेम्पोचा हप्ता थकल्याने तो भरण्यासाठी सोमवारी दुपारी दुचाकीवर नगरला गेला.काम आवरून गावी परतत असताना रात्री ११ च्या दरम्यान बसने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळुज ता.आष्टी येथे घडली.संदिप आश्रुबा आंधळे वय (वर्ष ३०) रा.लिंबोडी असे अपघातात मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील संदीप आश्रुबा आंधळे याच्या स्वमालकीचा मालवाहतूक आयशर टेम्पो आहे.त्याचा हप्ता थकल्याने सोमवारी दुपारी हप्ता भरण्यासाठी तो अहमदनगरला गेले होता.तेथील काम आवरून रात्री दुचाकीवरून गावी परतत असताना बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळुज येथील एका वळणार कळबं-बोरिवली बस क्रमांक एम.एच ०९ एफ.एल.०५७२ हिने रात्री ११ च्या दरम्यान दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात आंधळे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक मुकुंद एकशिंगे,पोलिस अंमलदार शिवदास केदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताला कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून लिंबोडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत आंधळे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,आई,वडील,भाऊ,बहिण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.