एअर होस्टेसच्या धर्तीवर इलेक्ट्रीक एसटीमध्ये शिवनेरी सुंदरी
मुंबई click2ashti एसटी महामंडळात नवीन इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या असून या बस राज्यभर प्रवाशांना घेऊन प्रवास करत आहेत. प्रवासी वातानुकुलीत इलेक्ट्रॉनिक बसमध्ये प्रवासाचा आनंद घेत असून या आनंदात अजुन भर पडणार आहे ती शिवनेरी सुंदरीची…. राज्यातील इलेक्ट्रीक बस अर्थात ई- शिवनेरीमध्ये एअर होस्टेसच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी नियुक्त करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने आज मंगळवारी घेतला.
एस. टी. महामंडळाचे अध्यक्भारत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.