व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आचारसंहितेपूर्वी आरक्षण मिळाले नाही तर राजकीय निर्णय घेणार : मनोज जरांगे

0

छत्रपती संभाजीनगर click2ashti बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगड येथे होणारा दसरा मेळावा ऐितहासिक करायचा आहे. यातून आपल्या समाजाची पुन्हा एकदा एकजुट दाखवायची आहे असे सांगून आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राजकीय निर्णय घेणार असल्याचे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलच्या हॉलमध्ये आज मंगळवारी समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले की, घराघरातून माझा मराठा दसरा मेळाव्यासाठी आला पाहिजे. यासाठी तयारी करा. यासाठी गावा-गावात बैठका घ्या. प्रचार प्रसार करा. महिलाही मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे. महिलांसाठी वेगळी सोय असणार आहे. आपल्याला समाजाची एकजूट दाखवायची आहे असेही जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.