सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेले हेलिकॉप्टर क्रॅश
पुणे click2ashti राष्ट्रवादी कॉॅंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी पुण्याहून उड्डाण केलेले हेलिकॉप्टर वावधन (जि.पुणे) येथे आज बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळले. ही घटना वावधन परिसरात मोकळ्या जागेत कोसळले.यात तीन जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी कॉॅंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना मुंबई येथून घेण्यासाठी आज सकाळी हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सच्या हेलिपॅडवरून उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर अवघ्या दहा ते बारा मिनिटात वावधन परिसरातील डोंगराळ भागात हेलिकॉप्टर क्रॅश झाले. याच हेलिकॉप्टरने सुनील तटकरे पुण्याहून बीड येथील सभेला आले होते. ही सभा संपल्यानंतर ते मुंबईला गेले होते. दरम्यान आज याच हेलिकॉप्टरने ते मुंबईहून पुण्याला येणार होते. दरम्यान तटकरे यांना घेण्यासाठी निघालेले हेलिकॉप्टर आज कोसळले. यात दोन पायलट आणि एक अभियंता यांना मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे पायलटला अंदाज न आल्याने हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची चर्चा आहे. दरम्यान अपघाताची माहिती कळताच हिंजवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.