उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे लागणार कामाला; पुन्हा मराठवाडा दौरा करणार
छत्रपती संभाजीनगर click2ashti मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सहाव्यांदा अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले होते. मात्र उपोषणाच्या नवव्या दिवशील समाजाच्या आग्रहास्तव जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले होते. उद्या गुरुवारी जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळताच जरांगे लगेच कामाला लागणार असून ते पुन्हा मराठवाडा दौरा करणार आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठका होणार आहे.
जरांगे म्हणाले की, माझा समाज माझं सर्वस्व आहे. समाज माझ्या पाठिशी असल्याने मला काहीही होणार नाही. माझी तब्बयेत आता ठणठणीत आहे. मराठा समाजाचा मेळावा व्हावा अशी समाज बांधवांची इच्छा आहे. यामुळे दसऱ्याला नारायणगडाच्या पवित्र भूमित मराठा समाजाचा दसरा मेळावा भव्य िदव्य स्वरुपात हाेणार आहे. मेळाव्या गडावर जय्यत तयारी सुरू असून सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. सगळ्यांनी एकत्र यावे नेत्यांच्या मागे फिरू नये. एखादा व्यक्ती समाजाचं मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही, असे मनोज जरांगे म्हणााले. दरम्यान उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीत जाणार आहे आिण परवापासून दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी मराठवाड्यासह सोलापूरचाही ते दौरा करणार आहेत.