व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

रासपचा ४० जागांवर दावा

0

मुंबई click2ashti आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आिण महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भात तयारी सुरु केली आहे. यातच महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील ४० जागांवर दावा सांगितला आहे. महायुतीने आम्हाला ४० जागा द्याव्यात नसता आम्ही स्वबळावर सर्व जागा लढवू असा इशारा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे.
अमरावती येथे रासपचा मेळावा झाल्यानंतर ते बोलत होते. रासपा गेल्या विधानसभेपासून महायुतीचा घटकपक्ष आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी परभणीतून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रासपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर मेळाव्यांतून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. रासप तयारीनिशी निवडणुक रिंगणात उतरणार असून भाजप, शिवसेना आिण राष्ट्रवादीने मिळून आपआपल्या कोट्यातील िमळून ४० जागा आम्हाला द्याव्यात अन्यथा आम्ही संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.