व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास बीडमध्ये ठोकल्या बेड्या

0

बीड click2ashti राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका तरुणाने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निदर्शना आल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी अंबड ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढविली आिण धमकी देणाऱ्या तरुणास बीडमध्ये बेड्या ठोकल्या.
29 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका अज्ञात इसमाने फोन करुन व मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. या प्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे हलविली. नाशिक पाेलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधात बीडला आले आिण त्यांनी धमकी देणारा तरुण रविंद्र यशवंत धनक यास बीडमधून अटक केली.त्याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.