व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी रिजवान शेख यांची नियुक्ती

0

आष्टी click2ashti-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याहस्ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी रिजवान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

499/- घ्या खरेदीवर जिंका पैठणी(ADVT)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी नुकतेच रिजवान शेख यांना नियुक्ती पत्र दिले आहे.आष्टी शहरातील सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारे व युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे रिजवान शेख यांच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व महेबुब शेख यांच्या नियुक्ती पत्राने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी रिजवान शेख यांची निवड करण्यात आली.त्यानच्या निवडीबद्दल पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील,राज्याचे खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे,खा.निलेश‌ लंके,खा.बजरंग सोनवणे,प्रदेश अध्यक्ष महेबुब ‌भाई शेख,मा.आ.साहेबराव‌ दरेकर, रामभाऊ खाडे, किशोर नाना हंबर्डे,आण्णासाहेब चौधरी, तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके,विजय आण्णा गाढवे, सुनिल नाथ,दादा झांजे,यांच्यासह आदि मान्यवरांनी रिजवान शेख यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.