व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तिरूपती बालाजी चे दर्शन घ्या झटपट अन् वेळ व पैसाही वाचवा

0

आष्टी click2ashti-जर आपण तिरूपती बालाजीचे दर्शन घेण्याच्या विचारात असाल तर आपणांस किती खर्च व किती वेळ लागेल हे आपण या बातमीत जाणून घेऊ या…

499/- घ्या खरेदीवर जिंका पैठणी(ADVT)

जर तुम्ही अहमदनगर,बीड,पुणे, सोलापूर वरून तिरूपती बालाजीला जाण्याचा विचार करत असाल तर दोन महिने आगोदर म्हणजे दर महिन्याच्या दि.20 ते 25 तारखे दरम्यान तिरूपती देवस्थानच्या वेबसाईटवर जाऊन आपण 300 रूपायांचे दर्शन तिकीट बुक करून, पुणे,दौंड,सोलापूरहून दोन महिने आगोदरच रेल्वेचे तिकीट साधारणपणे 400-500 रूपयाचे स्लीपर कोच चे रेणुगुंटा बुकींग करा संध्याकाळी 5-6 वा.पुणे येथून ट्रेनमध्ये बसल्यावर दुस-यादिवशी दुपारी 12-1 च्या दरम्यान रेणुगुंटा येथे पोहचू तिथून तिरूपतीला जाण्यासाठी बस किंवा रिक्षा मोठ्या प्रमाणावर असतात साधारणपणे 50 रूपये तिकीट दर आहे.त्यानंतर तुम्ही तिरूपती शहरात 500-600 रूपये किरायाची रूम राहण्यासाठी बुक करा तिथे फ्रेश होऊन, संध्याकाळी 5 वा.सुमारास तिरूमाला येथे व्यंकटेश भगवानाचे दर्शन घेण्यासाठी बसने जाण्या-येण्याचे 220-250 रूपये तिकीट दर आहे.वरती तिरुमला येथे जाण्यासाठी घाट सेक्शन असल्याने एक ते दिड तास लागतो.वरती गेल्यानंतर तुम्ही फोटोसेशन करून साधारणपणे सात वाजता दर्शन घेण्यासाठी रांगेत जाऊन तिथून निम्यात गेल्यानंतर आपले मोबाईल जमा करून घेतात.त्यानंतर दर्शनासाठी साधारणपणे तीन-चार तास लागतात.म्हणजे तुमचे दर्शन रात्री 11 वा. पर्यंत होईल.त्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून आपल्या दर्शन तिकीटावर एक लाडू मिळतो.एस्ट्रा घेण्याचा असेल तर 50 रूपये लागतात.परंतु एका व्यक्तीला चारच लाडू देवस्थान कडून मिळतात.रात्री 12 वाजण्याच्या आगोदर आपण तिरूमालामधून तिरूपती मध्ये येऊ शकतात.(कारण रात्री 12 ते 3 पर्यंत वाहतूक बंद करण्यात येते.)रात्री 12 वा.आपण तिथून निघाल्यास रात्री एक ते दिड घ्या दरम्यान रूममध्ये येऊन आराम करा.व लगेच पहाटे 4 वा. चेन्नई-पुणे ट्रेनमध्ये बसा आणि परतीचा प्रवास सुरु करा हि ट्रेन सोलापूरमध्ये दुपारी साडेपाच वाजता तर पुण्यात रात्री दहा वाजता पोहचती.म्हणजे आपण दुस-या दिवशीच आपण तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन येऊ शकतात.

499/-च्या खरेदीवर जिंका पैठणी आजच भेट द्या…

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कूण किती खर्च (एक व्यक्ती)

*आष्टी ते सोलापूर बस तिकीट-300-400
* दरम्यान सोलापूर येथून रेणूगुंटा तिकीट(स्लीपर कोच)-450-500/-
*रेणूगुंटा ते तिरुपती (रिक्षा,बस भाडे)-50/-
*तिरूपती रूम-500/-
*तिरुपती ते तिरूमाला बस तिकीट-220/-(जाणे-येणे)
* तिरूपती ते सोलापूर तिकीट(स्लीपर कोच)-450-500/-
*सोलापूर ते आष्टी बस तिकीट-300-400/-
*संपूर्ण ट्रिप जेवण खर्च-700-800/-
असा एकूण खर्च-3100/- ते 3500/-येऊन किमान हा प्रवास दर्शन तिकीट बुक असेल तर 36 तासात परत येताल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.