व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपला रामराम; शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार

0

मुंबई click2ashti-चार वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला रामराम ठोकला. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून विधानसभा निवडणूकही लढविणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

499/- च्या खरेदीवर जिंका पैठणी

हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे माजी आमदार आहेत. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते होते. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषविले होते. चार वर्षांपूर्वी भाजपमध्ये अनेक नेत्यांची इनकमिंग सुरू असताना त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. यंदा इंदापूरमधून विधानसभा लढविण्याची त्यांची इच्छा होती. मात्र महायुती सरकारकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने ते नाराज होते अशी चर्चा होती. अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आिण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.