व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मुर्शदपुर ग्रामपंचायतच्या जनतेतून सरपंचपदी शालन मुळे तर उपसरपचपदी वांढरे विराजमान

0

आष्टी-शहराचा अविभाज्य घटक असलेल्या मुर्शदपुर कासारी शिदेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आ.सुरेश धस यांच्या धवलक्रांती पॅनलला घवघवीत यश मिळाले या ठिकाणी जनतेतून सरपंचपदी आ.धस यांचे कट्टर समर्थक शालन मुळे हे निवडून आल्यानंतर बुधवारी पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत आ.धस समर्थक डॉ.जालिंदर वांढरे यांची निवड करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील महत्वाची आणि मोठी समजली जाणारी मुर्शदपुर कासारी शिदेवाडी या ग्रामपंचायतवर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आ.सुरेश धस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे मुर्शदपुर गणाचे प.स.सदस्य अशोक मुळे यांच्या सुविद्य पत्नी सौ.शालन मुळे यांनी 600 मतांनी विजय मिळवत सरपंचपदी विराजमान होण्याचा मान पटकावला.आ.धस यांच्या नेतृत्वाखाली धवलक्रांती पॅनेलने या ठिकाणी 8 जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले.बुधवारी पार पडलेल्या उपसरपचपदाच्या निवडी वेळी डॉ.जालिंदर वांढरे यांच्या बाजूने बहुमत सिद्ध झाल्याने ते उपसरपंचपदी विराजमान झाले.ही निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक बी.जे.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या प्रसंगी मुर्शदपुर कासारी शिदेवाडी तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.