आता म्युच्यूअल फंडमध्येही जिओची उडी
मुंबई click2ashti रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या जिओने आता म्युच्युअल फंड मार्केटमध्ये उडी घेतली आहे. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेसला सेबीने म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये उतरण्यास परवानगी दिली आहे. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस सोबतच ब्लॅकरॉक यांनाही सेबीने मंजुरी दिली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. जिओ फोन, िजओ टीव्ही अशा विविध व्यवसायानंतर आता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल फंड मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. जिओ आिण ब्लॉकरॉक या दोन्ही कंपन्यांनी म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी सेबी म्हणजे भांडवली बाजार नियामक संस्थेकडे अर्ज केला होता. त्यानुसार सेबीने दोन्ही कंपन्यांना मंजुरी दिली आहे.या दोन्ही कंपन्या त्यांच्या नव्या प्रकल्पासाठी 15-15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी जुलै 2023 मध्ये एकमेकांशी करार केलेला आहे