दुचाकीस्वाराला उडविले; खा.हंडोरेंच्या मुलाला अटक
मुंबई click2ashti चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ गोपाळ आरोटे जवळ हिट अँड रनची घटना घडली असून यात राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर गणेश हंडोरे याची शुगर वाढल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

खासदार हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याच्या कारने आज शुक्रवारी चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ गोपाळ आरोटे जवळ एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर गणेश याने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून गणेश हंडोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.