राहुल गांधींनी बनविली कांद्याची पात, वांग्याची भाजी
कोल्हापूर click2ashti काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन राहुल गांधी यांच्या हस्ते नियोजित होते. कार्यक्रमासाठी राहुल गांधी कोल्हापूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी जाऊन स्वत:च्या हाताने कांद्याची पात, वांग्याची भाजी बनवून जेवण केले.

कोल्हापूर येथील उचगाव येथील अजय सनदे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आज शुक्रवारी राहुल गांधी यांनी अापल्या दौऱ्यात सनदे यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी जवळपास एक तास वेळ सनदे कुटुंबियांसोबत घालवला. सनदे यांच्या घरी गेल्यावर राहुल गांधींनी स्वत: स्वयंपाक करत कांद्याची पात आिण वांग्याची भाजी करुन खाल्ली. राहुल गांधींचे हा साधेपण पाहून सर्वजण भारावुन गेले तर सनदे यांना आकाश ठेंगणे झाले होते. थेट लोकांमध्ये जावून त्यांचा होणे ही राहुल गांधींची वृत्ती आहे. भारत जोडो यात्रेमध्येही राहुल गांधी यांनी आपल्या साधेपणाची चुणूक दाखविली होती.