व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अशिक्षित तरूणाने महाराष्ट्राला वेड लावले BIG BOSS चा झापुक-झूपुक विजेता;बुक्कीत टेगुंळ,गोलिगत सुरज चव्हाण

0

मुंबई click2ashti-परिस्थीती कशीही असली तरी उराशी जिंकण्याचे स्वप्न बाळगले तर यश नक्की मिळते.हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असून,बिग बाॅसच्या पाचव्या पर्वाचा विजय महाराष्ट्राने पुन्हा एकदा चमत्कार दाखवून,बिग बॉस चा विजेता गरीब,आई-वडील नसलेला सुरज चव्हाण हा ठरविला असून,संपूर्ण महाराष्ट्र तुझ्याबरोबर असल्याचे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे.

जाहिरात

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेच्या प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनालेपार पडला.बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेश देशमुख पुन्हा एकदा धमाकेदार परफॉर्मन्ससह परतला. ग्रँड फिनालेचा हटके माहोल तयार करण्यासाठी बिग बॉसचे टॉप 6 six सदस्य आणि एक्स-सदस्य यांच्या हटके परफॉर्मन्सने कार्यक्रमाला रंगत आणली.अभिजीत आणि सूरजमध्ये तगडी स्पर्धा रंगली असून त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने आग लावून टाकली.बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता बुक्कीत टेगुंळ,गोलिगत सूरज चव्हाण ठरला आहे.’बिग बॉस मराठी’च्या सोळा सदस्यांचा प्रवास फक्त एका ट्रॉफीसाठीचा होता.’बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन आला.सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होतं विजेता कोणी एकच असणार.संपूर्ण महाराष्ट्राने या सीझनला भरभरून प्रेम दिलं.घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात,देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा रंगत गेली.

499/-च्या खरेदीवर जिंका पैठणी आजच भेट द्या…

मग ती टास्कविषयी असो,घरात होणार्‍या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्‍या नात्यांविषयीची असो. ‘बिग बॉस big boss मराठी’च्या या पर्वाचा नुकताच दिमाखात महाअंतिम सोहळा पार पडला,आणि शेवटी तो क्षण आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता.महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता मिळाला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा Suraj chavan सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता.तर अभिजीत सावंतने पटकावले दुसरे स्थान.सूरजला १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी.तसेच पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईक.महाराष्ट्राच्या लाडक्या रितेश भाऊंनी ritesh bhau यांनी विजेत्याची घोषणा केली आहे.आणि अशिक्षित तरूणाने महाराष्ट्राला वेड लावून झापुक-झूपूक विजय मिळवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.