हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी फिक्स
मुंबई click2ashti भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधन करताना यांना विधानसभेत पाठवा असे सांगितले तर जयंत पाटील यांनी विधानसभेत इंदापूरचे शिवधनुष्य तुम्हाला पेलायचेय असे जाहिरपणे सांगितल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवार फिक्स मानली जात आहे.
पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आज पाच वर्षांनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. आज सोमवारी इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला.