व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

प्रकृती बिघडल्याने मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा रद्द

0

मुंबई click2ashti मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अिजत पवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी सोलापूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौऱ्यासह सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सोलापूर येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र अचानक तब्ब्येत बिघडल्याने शिंदे यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे वाढल्याने दगदग होऊन शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.