व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

लाडकी बहिणा योजना सुरुच राहणार : देवेंद्र फडणवीस

0

सोलापूर click2ashti विरोधकांनी कितीही टीका करुन दे, काहीही होऊ दे तरी आम्ही सुरु केलेली लाडकी बहिण योजना कदापी बंद होऊ देणार नाही. आताही आपलेच सरकार येणार आहे यामुळे ही योजना सुरुच राहणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आई, बहिणीचे प्रेम विकत घेता येत नाही. साक्षात ब्रह्मदेव आले तरी त्यांना या प्रेमाचे मोल करता येणार नाही. परंतू पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, त्यांना हे कळत नाही असे म्हणून फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. दरम्यान विरोधकांनीही कितीही टीका करु द्या, तुम्ही काळजी करु नका. पुन्हा आपले महायुतीचेच सरकार येणार असल्याने लाडकी बहिण योजना सुरुच राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.