पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन
नवीदिल्ली वृत्तसेवा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 99व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला.
मोदींनी स्वतः ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.हिराबेन यांना मंगळवारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.याशिवाय त्यांना खोकल्याचाही त्रास होता.त्यामुळे त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.