व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विद्येमान आमदारापेक्षा मतदारसंघात विकासकामांसाठी निधी आपण आणला-सुरेश धस

0

आष्टी click2ashti-गेल्या वर्षापासून मी मतदार संघाचा आमदार नाही तरीही विद्येमान आमदारांपेक्षा जास्त निधी आणला आहे.परंतु आपले कार्यकर्ते आपण केलेले कामांची विद्येमान आमदारांपेक्षा जाहिरात बाजी करण्यास कमी पडलो असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री सुरेश धस यांनी केले.
आष्टा ह.ना.ते शिंदेवस्ती व शिंदेवस्ती ते गोगटे वस्ती हा रस्ता 3 कोटी 84 कोटी कामांचा शुभारंभ गुरूवार (दि.१०) रोजी सकाळी १० वा.माजी आ.सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या कार्रक्रमास बीड जिल्हा भाजपाचे निरीक्षक तथा छत्तीसगड चे माजी खा.चंदुलालजी साहू, ह.भ.प.अदिनाथ महाराज गळगटे, माजी जि.प.सदस्य अमरराजे निंबाळकर यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना धस म्हणाले,रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे त्यासाठी शेतक-यांनी रस्त्यावर अतिक्रमण न करता नियमात आहे तेवढा रस्ता करून घ्यावा म्हणजे पुढे अडचणी येणार नाहीत.आत्ता पर्यंत एवढा निधी दिला आहे.माझ्या राजकीय जिवनात सत्तेत असू किंवा नसू तरीही आष्टा जि.प. गटाला मी विकासासाठी काहिच कमी केले नाही.आणि येथून पुढेही मी कटीबध्द असल्याचेही माजीमंत्री सुरेश धस यांनी सांगितले.चंदचलालजी साहू म्हणाले,कोरोना काळात आपल्या मतदार संघाला वा-यावर न सोडता प्रत्येक नागरिकांच्या सुख दुःखात राहणारे नेता म्हणजे सुरेश धस होय,आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी येणा-या विधानसभेत महायुतीचा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन साहू यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.