राष्ट्रवादीचे नेते माजीमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हात्या
दोन आरोपी घेतले ताब्यात
आष्टी click2ashti-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना समोर अली आहे.या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली असल्याचे समजते. तीन ते चार तरूणांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला.गोळीबार झाल्यावर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे.
फटाके वाजवत असताना हा गोळीबार झाला असल्याचे समजते.स्वत;उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लीलावती रुग्णालयात संपर्क साधून डॉक्टरांशी बाबा सिद्दीकी यांच्याविषयी चौकशी केली होती.दरम्यान,लीलावती रुग्णालायचा परिसर कार्यकर्ते व समर्थकांनी भरला होता.