व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

हीच ती वेळ… सरकारला जागा दाखवा, समाजाची प्रतिष्ठा जपा : जरांगे

0

जालना click2ashti मराठा समाजासाठी आता हीच ती वेळ आहे. यातून समाजाने सरकारला त्यांची जागा दाखवत समाजाची प्रतिष्ठा जपावी असे आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
निवडणूका आयोगाने राज्यातील निवडणूक जाहिर केल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाशी संवाद साधत सरकार आिण उपमुख्यमंत्री देवंेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे म्हणाले की, गेल्या १४ महिन्यांपासून मराठा समाज आरक्षण मागतोय. पण सरकार प्रत्येक वेळी वेळ मारुन नेत आहे. यामुळे आता समाजाला संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य वेळ आली आहे. या निवडणुकीत परिवर्तन केले नाही तर पुन्हा रडण्याासठी माणूस शिल्लक राहणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या तरुणांचे आयुष्य बरबाद केले असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.