जालना click2asthi राज्यातील निवडणूका जाहिर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणूकीत मराठा योध्दा मनोज जरांगे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देण्यासंदर्भात 20 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाची बैठक होणार असून यावेळी मनोज जरांगे पाटील समाजाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान लोकसभेपेक्षा दुपटीने ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवा असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.
विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी महायुतीविरोधा हाबुक ठोकले असून मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभा करण्याची घोषणा जरांगे यांनी यापूर्वी केली होती. यानंतर अनेक दिग्ग्जांनी जरांगे यांची भेट घेतली. आचारसंहिता लागल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन 20 ऑक्टोबरला अंतरवली येथे समाजाची बैठक होणार असल्याचे सांगितले. या बैठकीत विधानसभेत उमेदवार उभे करायचे की पाडायाचे याबाबत समाजाशी संवाद साधून निर्णय घेतला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह सकाळी 9 ते 4 यावेळेत बैठकीला उपस्थित राहावे असे जरांगे म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे अिस्तत्व नष्ट करण्याचे ठरवले आहे. यामुळे मराठा समाजाने 100 टक्के मतदान करुन लोकसभेपेक्षा विधानसभेत दुपटीने ताकद दाखवावी. आता सर्व धुरा मराठ्यांच्या हातात आहे. आपली मुलं, समाज मोठा होण्यासाठी मतदानातून ताकद दाखवा असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.