विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ४० लाख-वैशाली पाटील
आष्टी click2ashti-विधानसभा -मतदारसंघासाठी मंगळवारपासून – आचारसंहिता लागू झाली आहे.या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या -खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये इतकी राहणार आहे.दरम्यान विधानसभेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये इतकी अनामत रक्कम राहणार आहे.अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघाची निवडणुकीच्या अनुषंगाने आष्टी तहसिल कार्यालयात बुधवार (दि.१६) रोजी दुपारी ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.पुढे बोलतांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पाटील म्हणाल्या,आष्टी मतदारसंघात पुरूष मतदार २ लाख ३ हजार ८३८,स्त्री मतदार १ लाख ९ हजार १९१ असे एकूण ३ लाख ८३ हजार ३० मतदार असून,एकूण ४४० मतदान केंद्र यामध्ये ३७ मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याची माहिती पाटील यांनी दिली.