आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वसिमा शेख यांची नियुक्ती
आज पदभार स्विकारणार
आष्टी click2ashti-विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ वी प्रक्रीया पार पाडण्याकरीता उप विभागीय अधिकारी,पाटोदा,हे रिक्त असलेल्या पदी उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन),जिल्हा नागपूर येथील श्रीमती वसिमा शेख यांची नियुक्ती चे आदेश उप सचिव महाराष्ट्र शासन महेश वरूडकर यांनी दिला आहे.
याबाबत अधिक असे की,भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक ०१.१०.२०२४ च्या अधिसुचनेन्चये, उप विभागीय अधिकारी,पाटोदा जिल्हा बीड हे पद २३१-आष्टी या विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ वी प्रक्रीया पार पाडण्याकरीता उप विभागीय अधिकारी, पाटोदा,जिल्हा बीड हे रिक्त असलेले पद तातडीने भरणे आवश्यक होते.त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने,श्रीमती वसिमा शेख, उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन),जिल्हा नागपूर यांच्या सेवा निवडणुक कालावधीकरीता उप विभागीय अधिकारी, पाटोदा,जिल्हा बीड या पदावर वर्ग करण्यात येत असून श्रीमती शेख यांना सदर पदावर हजर होण्याकरीता सध्याच्या पदावरुन दिनांक १६.०१०.२०२४ (म.नं.) रोजी तात्काळ एकतफी कार्यमुक्त करण्यात आले असून,श्रीमती वसिमा शेख,उप जिल्हाधिकारी यांनी उप विभागीय अधिकारी पाटोदा,जिल्हा बीड या पदाचा कार्यभार आज दिनांक १७.१०.२०२४ (म.पु.) रोजी स्विकारातील.