मविआचे २०० जागांवर शिक्कामोर्तब; ८४ जागा काँग्रेसला
मुंबई click2ashti निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहिर केल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.महाविकास आघाडी आणि महायुतीने जागा वाटपासंदर्भात बैठकांवर बैठका घेणे सुरु केले आहे.दरम्यान महाविकास आघाडीने २८८ पैकी २०० जागांवर शिक्कामोर्तब झाले असून काँग्रेसच्या वाट्याला ८४ जागा आल्या आहेत.दरम्यान काँग्रेसकडून २० ऑक्टोबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टवार यांनी दिली.
राज्यातील २८८ विधानसभेच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून खलबते सुरू होती. मात्र निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्यानंतर महाविकास आघाडीने बैठकांचे सत्र सुरु केले असून आज झालेल्या बैठकीत २८८ पैकी २०० जागांवर एकमत झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.यात काँग्रेसच्या वाट्याला ८४ जागा आल्या आहेत.उर्वरित जागांबाबतही लवकरच निर्णय घेतलाजाईल असेही पवार म्हणाले.