व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अजित पवारांना पुन्हा जोर का झटका, हा आमदार साथ सोडणार

0

मुंबई click2ashti राज्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून प्रत्येक पक्षातील नाराज आमदार पक्ष प्रवेश करत आहेत.यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक तथा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे लवकर शरद पवार यांची तुतारी हाती घेणार असल्याचे समजते.
पदवीधर मतदारसंघातून आमदार सतीश चव्हाण हे दोनदा विजयी झालेआहेत.ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळलले जातात.आमदार चव्हाण हे गंगापूर मतदासंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.मात्र हा मतदारसंघ भाजपचा असल्याने सतीश चव्हाण यांचे स्वप्न भंगले आहे.दरम्यान ‘बहुजनांचे प्रश्न सुटतील,या उद्देशाने आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झालो.मराठा,धनगर, ओबीसी,आदिवासी,मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती.मात्र सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही’,अशी खंत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली.यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल आणि नंतर ते शरद पवार गटाकडे प्रवेश करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.