व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांनी एकत्र येण्याची गरज -माजी आ.भीमराव धोंडे

पक्षाने तिकीट नाकारले तर अपक्ष निवडणूक लढविणार- डॉ.अजय धोंडे

0

आष्टी click2ashti-सध्या सर्वत्र जाती-पातीचे राजकारण सुरू असून,आपल्या राजकीय कारकीर्द मध्ये कधीही जात पाहिली नाही.पण या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील लक्ष्मी लाॅन्स शुक्रवार (दि.१८) रोजी दुपारी २ वा.आयोजित करण्यात आलेल्या मतदारसंघातील मागासवर्गीय व भटके विमुक्त समाज बांधवांचा संवाद मेळाव्यात माजी आमदार भीमराव धोंडे बोलत होते.यावेळी भाजपा भटके विमुक्त राज्य उपाध्यक्ष भाग्यश्री ढाकणे,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय धोंडे,अँड.रत्नदिप निकाळजे,माजी जि.प.सदस्य वर्षा माळी,शंकर देशमुख,युवराज सोनवणे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना माजी आ.धोंडे म्हणाले,मी मतदारसंघाचा ९ जुलै पासून दौरा केला.या दौऱ्यात मला भरपुर समस्या समोर आल्या त्यातील प्रामुख्याने भटके विमुक्त व मागासवर्गीय समाजाचे मेळावे झाले नाहीत म्हणून ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.मागास्वर्गीय समाजाला प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या नजरेने पाहिले जाते.आता आपल्या मतदार संघात ही ओळख पुसून टाकायची आहे.मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांनी एकत्र येण्याची काळाची गरज असून,सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्र पेटला,पण आरक्षणा पेक्षा बुध्दीमतेला जास्त महत्व आहे‌.कडा शहरात मी माझ्या स्वतःच्या हाताने बसविला आहे.तसेच आता तो रस्त्याच्या मध्यभागी बसविण्यासाठी आपण प्रयत्न करून तो मध्यभागी बसविणार आहोत. तसेच आपला सर्वांच्या आरक्षणासाठी पाठिंबा असल्याचेही धोंडे यांनी सांगितले.भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के म्हणाले,२०१९ पराभव हा समोरून झाला नसून पाठिमागून झाला आहे.आपल्याच लोकांनी आपला घात केला असल्याचे सांगत भाजप पक्ष आपल्याला उमेदवारी देणार नाहीत.त्यामुळे आपल्याला धाडसी निर्णय घेयची वेळ आली असल्याचे स्वत:च भाजपा तालुकाध्यक्ष यांनी सांगत पुढे म्हणाले,मी भीमराव धोंडे यांच्यासोबत काम करीत आहे.पण त्यांनी आज पर्यंत कधीही जात न पाहता सर्व जातींना सोबत घेऊन काम केले आहे.मतदार संघात त्यांनी अनेक विकासात्मक कामे केले आहेत.त्यांनी मतदारसंघात शैक्षणिक, शेतीविषयक,रस्ते व पाणि प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केले असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय धोंडे म्हणाले,गेल्या पाच वर्षाच्या काळात आपल्या मतदार संघात सत्तेचा ऊतमात करून जाती-पातीचे राजकारण केले आहे.सन २०१४-२०१९ पर्यंत साहेबांच्या काळात फक्त विकासाचेच राजकारण केले.आणि त्याकाळात मतदार संघात सर्वाधिक रस्ते केले आहे‌.जर या निवडणुकीत आपल्याला पक्षाने उमेदवारी नाकारली तरी अपक्ष निवडणूक लढवून निवडून आणण्याचे मतदारांनी ठरविले असल्याचे अजय धोंडे यांनी सांगितले.अँड.रत्नदिप निकाळजे म्हणाले,भिमराव धोंडे यांनी त्यांच्या सत्तेच्या काळात सर्वांगिण विकास केला आहे.तसेच भटके विमुक्त व मागासवर्गीय समाजाच्या खंबीरपणे पाठिशी राहिले असल्याने यावेळेस त्यांच्यापाठिशी खंबीरपणे उभे राहून सर्वाधिक मताने विजय करण्याचा निश्चय केला असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश दिवटे यांनी करून आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.