कितीही समोर येऊद्या जो पर्यंत सर्वसामान्य माणूस माझ्या सोबत आहे मी तोपर्यंत मी कुणालाच घाबरत नाही-सुरेश धस
आष्टी click2ashti-माझ्याकडे या मतदार संघाचा डेवोलपमेंट प्लॅन आहे सुजलाम सुफलाम हा मतदार संघ करण्याचा माझा पहिल्या पासून माणसं आहे. तुम्ही संधी दिल्यास हे सर्व मी करून दाखविणार आहे.कुणी कितीही वल्गना करुद्या कितीही समोर येऊद्या जो पर्यंत गोरगरीब,सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे मी तोपर्यंत मी कुणालाच घाबरत नाही म्हणत आ.सुरेश धस यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
गुरुवारी शहरातील मोरेश्वर लॉन येथे आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष संजय मेहेर शिरूर नगराध्यक्ष रोहिदास पाटील,मधुसूदन खेडकर, डॉ.बडजाते, अभिजीत डूगरवाल,फैयाज भाई,अशोक तळेकर,गोरख कर्डिले,संतोष भंडारी,संपत शेळके, नागेश कर्डिले, हरून शेठ,शहादुला बेग,हेमंत पोखरणा,योगेश भंडारी,दर्शन कांकरिया,रतिलाल कटारिया, कल्याण भोसले,अजित बोरा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना धस म्हणाले की,ज्या वेळी कडा बाजारपेठ माझ्या ताब्यात आली त्या वेळी साधं पोताड्याच हॉटेल असणार कडा मार्केट आज त्या मार्केटचा कांदा दुबईला जात आहे.परळी येथे खत साठा करायचे रॅक होते.ते अहील्यानगराला आणण्याचे काम मी केले.त्यामुळे वाहतूक कमी होऊन व्यापाऱ्यांना ते सोयीस्कर मिळण्यास मदत झाली.खताचा पुरवठा वारंवार आपल्याला कमी मिळत होता त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून तो पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केला.आज एकही कृषी दुकानदाराची खताच्या कमतरतेबाबत तक्रार नाही.व्यापाऱ्यांमध्ये किमान 8 दिवसातून एकदा बसून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतो त्याच निरसन करण्याचं काम करतो.आयुष्यात मदत करताना कधीच हिशोबाची डायरी ठेवली नाही.म्हणूनच लाखोंनी माणसं जोडत गेली.ती आजही सत्ता असो अथवा नसो ती कायम माझ्यासोबत आहेत हीच माझी संपत्ती असल्याचे सांगत मच्छिंद्रनाथ गडावर 21 कोटी रुपयांची विकास काम सुरू आहे.त्याचा कायापालट करण्याचं काम मी केलं.देवस्थानाला 19 एकर जमीन होती आता 150 एकर जमीन झाली.आष्टी तालुक्यात सव्वादोन टीएमसी पाणी मी आणून दाखविले आहे.वेळ आली की ते पुराव्यासह तुमच्यासमोर सिध्द करून दाखवणार आहे.58 टी एम सी जे पाणी आलेलं आहे ते भविष्यामध्ये पाटोदा आणि शिरूर तालुक्याला वळवणार हा प्रामाणिकपणे शब्द तुम्हाला देतो म्हणत माझा मोबाईल दिवस रात्र माझ्या जवळ असतो कारण कधी कुणाची काय अडचण असेल ती सांगता येत नाही परंतु एक सांगतो ज्या दिवशी मोबाईल बंद करील हॉल मध्ये ठेवीन त्या दिवशी मी माझ राजकारण बंद करीन.रात्रंदिवस झटाव लागतं तेव्हा माणसं जमतात.स्वतःच्या स्वार्थासाठी काही जण जातीपातीचे राजकारण करू पाहत आहेत ही जनता माझ्या पाठीशी आहे तो पर्यंत मी कशालाच घाबरत नाही असे शेवटी धस म्हणाले.यावेळी हजारो व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.