मस्के यांनी दिला भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
बीड click2ashti भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला आहे. गामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मस्के यांच्या राजीनाम्याचा निर्णय महत्वपूर्ण मानला जातो.
काही वर्षांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विधानसभेत राजेंद्र मस्के यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी िमळण्याची शक्यता धुसर असल्याने मस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून मस्के अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मस्के यांनी राजीनामा दिला असला तरी वरिष्ठांनी तो मंजूर केला की नाही हे अद्याप कळाले नाही.