गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात मुख्यमंत्री अग्रेसर : सुप्रिया सुळे
मुंबई click2ashti पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी असलेला श्रीकांत पांगारकर याने आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा सापडला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. अशा प्रकरणातील गुन्हेगारांना पक्षात घेऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात मुख्यमंत्र्यांचे सरकार अग्रेसर असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे अतिशय धक्कादायक आहे. गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण असल्याचे सुळे यांनी म्हटले. प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे. म्हणूनच महाराष्ट्राला खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.